मुंबई मध्ये देशातील 21 वं आणि महाराष्ट्रातील दुसरं आयआयएम (IIM) सुरू करण्याला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांकडून अनेक उद्योगपतींकडून देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात आयआयएम सुरू करण्याची मागणी होती अखेर ती मंजूर झाली आहे. Indian Institute of Management मुंबई मध्ये 350 विद्यार्थी एकावेळेस शिक्षण घेऊ शकणार आहेत. National Institute of Industrial Engineering (NITIE)चेच आयआयएम मध्ये रूपांतरण केले जाणार आहे.
भाजपा च्या आशिष शेलार यांनी याबाबत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तर भाजपाकडून एक मोहिम राबवत याबाबत कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्याची आणि त्याबाबत काही प्रस्ताव असल्यास ते देखील स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईमध्ये विद्यार्थ्यांसाठी IIM सुरू करण्याचा निर्णय तसेच देशातील तरुणांसाठी मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती मुंबईमधील महाविद्यालयीन युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १७ जुलैपासून ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान @BJYM सुरू करणार.#EkSahiBhavishyasathi #BJP #Mumbai #youth #students… pic.twitter.com/C8fOXFOfj4
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2023
NITIE ची स्थापना भारत सरकारने 1963 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या मदतीने केली होती. आता त्याचं रूपांतरण मुंबई आयआयएम मध्ये केले जाणार आहे. IIM Act मध्ये बदल करून NITIE Mumbaiचे नामांतर ‘IIM Mumbai’होणार आहे. त्यामुळे आता मॅनेजमेंटच्या अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधीसाठी मुंबई बाहेर जावं लागणार नाही.
ही घोषणा संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांचा एक भाग आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन दिल्ली मध्ये 20 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे.