Photo Credit- X

महाराष्ट्र सीईटी सेल कडून पीसीबी ग्रुप (PCB Group) पाठोपाठ आता पीसीएम ग्रुपची (PCM Group)  देखील आंसर की जारी केली आहे. पीसीएम ग्रुपची 5 मे 2025 दिवशी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातून 24,744 विद्यार्थी सामोरे गेले होते. CET 2025 PCM, PCB परीक्षा ही राज्यात इंजिनियरिंग, फार्मा च्या प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची असते. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना लॉगिन करून पीसीएम ग्रुपची आन्सर की डाऊनलोड करता येणार आहे.सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार 24 मे 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती सादर करता येणार आहेत.

Answer Key वर हरकती कशा कराल सादर?

  • अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • “Click here to raise objection“ वर क्लिक करा.
  • Log in Tab वर क्लिक करा. तुमचा roll number, date of birth आणि captcha code टाका.
  • साईन ईन वर क्लिक करा आता तुमची आन्सर की दिसेल.
  • ज्यावर हरकत असेल त्याचा question ID निवडा आणि त्याची सविस्तर माहिती द्या.
  • प्रति प्रश्न 1000 रूपये भरा आणि सबमीट वर क्लिक करा.

    हरकत कधी पर्यंत सादर करू शकता?

    MHT CET PCM 2025 च्या आन्सर की वर हरकत सादर करण्याची मुदत 22 मे 24 मे आहे तर पीसीबी च्या आन्सर की वर हरकत सादर करण्याची मुदत 19 मे ते 21 मे होती. इंजिनियरींग प्रवेशासाठी आता PCM विषय बंधनकारक नाहीत; AICTE चा निर्णय.   

    MHT CET 2025 PCM, PCB चा निकाल कधी

    MHT CET 2025 PCM, PCB चा निकाल एकत्रच जाहीर केला जाणार आहे. आन्सर की ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता MHT CET 2025 PCM, PCB चा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाऊ शकतो. हा निकाल देखील विद्यार्थी ऑनलाईन cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर पाहू शकतात.