State Common Entrance Test Cell, Maharashtra कडून MAH CET 2025 च्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बदल करण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखेची माहिती MAH CET ची अधिकृत वेबसाईट mahacet.org वर देण्यात आली आहे. आता सीईटी सेल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, MAH MHT CET 2025 ची पीसीबी ग्रुपची परीक्षा 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. यामध्ये 10,14 एप्रिलला परीक्षा नसेल तर पीसीएम ग्रुपची परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान होणार आहे. यामध्ये 24 एप्रिलला परीक्षा नसेल.
सीईटी सेल कडून यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये परीक्षा 16 मार्च ते 27 मार्च दरम्यान होणार असल्याचं सांगितलं होतं. आता वेळापत्रकामध्ये बदल करून 19 मार्च ते 2 मे पर्यंत होणार आहे. MH CET 3-Year LLB 2025: विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीची नोंदणी सुरू; cetcell.mahacet.org वर करा 27 जानेवारी पर्यंत अर्ज .
दरम्यान MHT CET 2025 ची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 30 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. पीसीएम, पीसीबी ग्रुपची परीक्षा साठी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. लेट फी भरून विद्यार्थ्यांना 22 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी 500 रूपये लेट फी भरावी लागणार आहे.
MAH-M.Ed-CET 2025 परीक्षा 19 मार्च 2025 ला होणार आहे. MAH-LLB-3 Year -CET 2025 परीक्षा 20 मार्च आणि 21 मार्चला होणार आहे. MAH-MCA CET-2025 परीक्षा 23 मार्च 2025 ला होणार आहे. तर MAH-B.Ed (General & Special) आणि B.Ed ELCT- CET-2025 परीक्षा 24,25 आणि 26 मार्चला होणार आहे. MAH-B.P.Ed-CET 2025 आणि MAH-M.HMCT CET-2025 27 मार्चला होणार आ हे.