Online | Pixabay.com

महाराष्ट्र स्टेट कॉमन एंटरन्स टेस्ट सीईटी सेल (Maharashtra State Common Entrance Test (CET) Cell) कडून आता MH CET 3-Year LLB 2025 Programme साठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. 3 वर्षामध्ये एलएलबी करू इच्छिणार्‍या लोकांना आता ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यासाठी cetcell.mahacet.org वर लॉगिन करता येणार आहे. नक्की वाचा: MHT CET 2025 Exams Dates: महाराष्ट्र सीईटी सेल कडून परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक cetcell.mahacet.org वर जारी.  

महत्त्वाच्या तारखा

  • रजिस्ट्रेशन साठी अंतिम तारीख - 27 जानेवारी 2025
  • MH CET 3-Year LLB परीक्षा तारखा - 20 मार्च आणि 21 मार्च 2025

MH CET LLB 2025 साठी कसा कराल अर्ज?

  • cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्या.
  • आता MH CET 3-Year LLB साठी रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
  • तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक असलेली कागदपत्र अपलोड करा.
  • ऑनलाईन माध्यमातून अ‍ॅप्लिकेशन फी भरा.
  • आता तुमचा फॉर्म सबमीट करून त्याची एक कॉपी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

इथे पहा रजिस्ट्रेशन साठी डिरेक्ट लिंक.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता निकषांची पूर्तता केली आहे याची खात्री करावी. रजिस्ट्रेशन विंडो 27 जानेवारी, 2025 रोजी बंद होत असल्याने अर्ज वेळेवर सादर करणे महत्त्वाचे आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया केवळ ऑनलाईन आहे ऑफलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

MH CET Law Exam मध्ये इंग्रजी, कायदेशीर तर्क, गणित, तार्किक तर्क, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय समाविष्ट आहेत.