
Congratulations Message For 10th Pass: यंदा दहावीची परीक्षा (SSC Exam 2022) 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विनाअुनदानीत शाळांच्या शिक्षकांनी या आधी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागतो की काय अशी चिंता व्यक्त केली जात होती. परंतु 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल लागला, तर आता 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. दहावीचे विद्यार्थी mahresult.nic.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात.
विद्यार्थी scresult.mkcl.org, maharashtraeducation.com, result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in. अशा साईट्सवरही त्यांचे रिझल्ट्स चेक करू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्वांनाच आपल्या निकालाची उत्सुकता लागलेली आहे. अशात तुमच्याही घरात, परिसरात, मित्र मंडळींमध्ये दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी असतील. आज निकालानंतर खास SMS, Images, Messages, Wishes द्वारे तुम्ही त्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ शकता.






निकालाच्या वेळी नेटवर्क व्यवस्थित काम करत नसेल, तर एसएमएसद्वारेही स्कोअरकार्ड पाहता येईल. खाली दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने तुम्हाला SMS वर निकाल मिळेल.
- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये MHSSC <seat number> या फॉरमॅटमध्ये मेसेज लिहा.
- आता हा लिखित संदेश 57766 वर पाठवा.
- तुमचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे प्राप्त होईल.
दरम्यान, परीक्षेच्या निकालानंतर काही विद्यार्थी खचून जातात, त्यांना नैराश्य येते. अनेकवेळा टोकाची पावले उचलली जातात. मात्र लक्षात घ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या खचितच महत्वाच्या आहेत मात्र त्या पुढील आयुष्याचे पूर्णतः मार्ग ठरवत नाहीत. आज अशी अनेक उदाहरणे आहेत जी अशा परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होऊनही आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत. त्यामुळे समाधानकारक गुण मिळाले नसले तरी वाईट वाटून न घेता प्रयत्न करत करत राहणे महत्वाचे आहे.
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. (हेही वाचा: उद्या mahresult.nic.in वर जाहीर होणार 10 वी परीक्षेचा निकाल, उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची आवश्यकता; जाणून घ्या मागील पाच वर्षांतील उत्तीर्णांची सरासरी टक्केवारी)
गुणपडताळणीसाठी सोमवार, दिनांक 20 जून 2022 ते बुधवार, दिनांक 29 जून 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी सोमवार, दिनांक 20 जून 2022 ते शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे) भरता येईल. मार्च- एप्रिल 2022 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील.