Results 2020 (Archived, edited, representative images)

Maharashtra SSC & HSC Results 2020: महाराष्ट्रात आता विद्यार्थी वर्गात दहावी बारावीच्या निकालाची उत्सुकता आहे मात्र अद्याप महाराष्ट्र शिक्षण बोर्ड मंडळाकडून निकालाच्या तारखे संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. कोरोना व्हायरसमुळे यंदा पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी सुद्धा आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. अलीकडे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती पाहता साधारण 27 ते 28 जुलै पर्यंत निकाल लागू शकतो असे दिसून येत आहे. पेपर तपासणीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. निकालाच्या तारखेबाबत योग्य माहिती जाणून घेण्यासाठी 'mahresult.nic.in' ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनाची दहशत असल्याने भूगोलाचा पेपर यंदा रद्द करण्यात आला आहे. या विषयाचे मार्क्स विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा मंडळाने केली आहे. तर बारावीचे पेपर संपल्यानंतर लगेचच लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते. या निकालाची तारीख जाहीर होताच निकाल ऑनलाईन कसा पाहायचा याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या.Maharashtra Board Exams 2020 Results: महाराष्ट्र राज्य 10वी, 12 वी बोर्डाचे निकाल तारखांबाबत शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण; विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला

10 वी, 12 वी चे ऑनलाईन निकाल कसा पाहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतील. जुलै महिन्यात निकाल लागल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून प्रथम वर्षाच्या आणि 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.