(Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) च्या उन्हाळी 2022 च्या डिप्लोमा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट msbte.org.in वर ऑनलाइन निकाल पाहू शकतात. येथे पात्र ठरलेले उमेदवार महाराष्ट्रातील टॉप पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतील. यावेळी एमएसबीटीईची परीक्षा जूनच्या अखेरीस घेण्यात आली होती. उमेदवार खाली दिलेल्या सोप्या चरणांद्वारे त्यांचा निकाल तपासू शकतात.

MSBTE ने 8 ते 30 जून दरम्यान डिप्लोमा इन इंजिनीअरिंग आणि फार्मसी परीक्षा आयोजित केल्या होत्या. MSBTE निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा आसन क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक वापरणे आवश्यक आहे.

असा पाहू शकता निकाल

msbte.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आलेल्या पेजवर, समर 2022 निकाल लिंकवर क्लिक करा

तुमचा आसन/नोंदणी क्रमांक टाका आणि सबमिटवर क्लिक करा

MSBTE निकाल प्रदर्शित केला जाईल

डाउनलोड करा आणि निकालाची प्रिंटआउट घ्या

परिक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी 

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) हे महाराष्ट्र सरकारचे एक स्वायत्त बोर्ड आहे जे राज्यातील डिप्लोमा लेव्हल टेक्निकल एज्युकेशनशी संबंधित बाबींचे नियमन करण्यासाठी अनिवार्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की MSBTE च्या तांत्रिक परीक्षा जूनच्या शेवटी घेण्यात आल्या होत्या, ज्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अशा स्थितीत सर्वच उमेदवारांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. (हे देखील वाचा: FYJC Admission 2022-23: 11 वी प्रवेशाची पहिली प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट आज; जाणून घ्या इथे संपूर्ण वेळापत्रक)

परीक्षा दोनदा घेतली जाते

बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मूळ मार्कशीट 10 ते 15 दिवसांत उपलब्ध करून दिली जाईल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ ही देशभरातील प्रसिद्ध पॉलिटेक्निक संस्थांपैकी एक आहे. मंडळ वर्षातून दोनदा परीक्षा घेते. हे उन्हाळी आणि हिवाळी डिप्लोमामध्ये वर्गीकृत आहे.