Maharashtra FYJC Online Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 26 जुलैपासून सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यास वेळ दिला होता. आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग- 2 विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपासून भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेज प्राध्यान्य क्रम भरायचा आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर आठवडाभरा नंंतर शिक्षण महासंचालनालयाने सोमवारी अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिल्या मेरिट लिस्ट पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले आहे वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश अर्जाचा भाग 1 अजूनही भरणे बाकी आहे त्यांना सुद्धा भाग 1 आणि भाग-2 सोबत भरायची संधी आहे. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रासाठी लागू असणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, 12 ऑगस्ट पासून अल्पसंख्यांक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश आणि पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे.
.FYJC Admission 2020 How To Fill Form?
-कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवणार फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी mumbai.11thadmission.org.in. या अधिकृत संकेतस्थळावर जा
- होम पेज वर लॉग इन आयडी व पासवर्ड भरायचा आहे. यापूर्वी आपल्याला शाळेतून लॉग इन आयडी बनवून दिला असेल तो न चुकता भरा.
- खाली CAPTCHA कोड विचारला जाईल तो सुद्धा भरा.
- तुम्हाला फॉर्म दिसेल, त्यात सर्व रकाने योग्य माहितीनुसार भरा.
-फॉर्म लॉक करा.
दरम्यान, 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान अर्जाचा भाग 2 भरता येणार आहे. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान तात्पुरती- संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 30 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असुन31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे.