महाराष्ट्र बोर्डाअंतर्गत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी उद्या दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होण्याच्या बातम्या येत होत्या, अखेर आज महामंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. विद्यार्थी MSBSHSE बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर हा निकाल पाहू शकतात.
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल -
http://mahresult.nic.in
www.mahresult.nic.in
ww.resul.mkcl.org
जर तुमच्याकडे बीएसएनएल नेटवर्क असेल तर तुम्ही एसएमएसद्वारेही निकाल पाहू शकला. यासाठी MHHSC असा एसएमएस 57766 वर पाठवून तुम्ही निकाल प्राप्त करू शकता. (हेही वाचा: 12 वीचा निकाल तारीख जाहीर, 28 मेला दुपारी 1 वाजता mahresults.nic.in वर लागणार)
दरम्यान, 12 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात झाली होती. तर 10 वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या काळात घेण्यात आली. बारावी परीक्षेला राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 3 लाख 83 हजार विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत. गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता.