Job Recruitments: LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अनेक पदांसाठी भरती जाहीर!
LIC | (File Image)

पदवीधर विद्यार्थ्यांसाठी (Graduate Students) नोकरीची उत्तम संधी (Job Opportunity) आहे. LIC कडून अनेक पदांची भरती जाहीर करण्यात आली असुन या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा अशी घोषणा LIC च्या वतीने करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे. तसेच उमेदवार अधिकृत साइट lichousing.com वर जाऊन आपला अर्ज दाखल करू शकतात. तसेच या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे तर ऑनलाइन परीक्षा (Online Examination) आणि मुलाखतीच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येईल.

 

LIC कडून या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक व्यवस्थापकाच्या 30 आणि सहाय्यकांच्या 50 पदांसाठी भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात. तरी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणं अनिवार्य आहे. सहाय्यक पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 33 हजार 960 रुपये वेतन दिलं जाईल तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 21 ते 28 वर्ष असावं. तर सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सुमारे 80 हजार रुपये वेतन दिलं जाईल तर उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षां दरम्यान असावं. (हे ही वाचा:- Government Job for Engineers: इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या कशी आहे अर्ज प्रक्रीया)

 

ऑनलाइन परीक्षा (Online Examination) आणि मुलाखतीच्या (Interview) आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेची वेळ 120 मिनिटांची असेल. ज्यामध्ये 200 प्रश्न (Questions) विचारले जातील. या पदांसाठी नोंदणी (Registration) करण्याची शेवटची तारीख  25 ऑगस्ट 2022 आहे असुन परीक्षेच्या एक ते दोन आठवड्यापूर्वी प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे. तर संबंधीत परीक्षा सप्टेंबर (September) किंवा ऑक्टोबर (October) मध्ये घेण्यात येईल.