JEE Mains 2023 Result Declared: एनटीएने jeemain.nta.nic.in वर JEE मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे पाहाल निकाल आणि स्कोअरकार्ड
Representational Image (File Photo)

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 जानेवारी सत्र परीक्षेचा निकाल आज (7 फेब्रुवारी) जाहीर (JEE Mains 2023 Result Declared) केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर स्कोअरकार्ड पाहू शकतात. NTA ने सुरुवातीला JEE मुख्य सत्र 1 च्या अंतिम परिक्षेची उत्तर पत्रिका (Answer Key of JEE Main Session 1 ) जारी केली. दरम्यान, उमेदवार ntaresults.nic.in वर JEE Mains चा निकाल 2023 देखील पाहू शकतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेईई मेन 2023 जानेवारी सत्राच्या निकालामध्ये 95.8% हा उच्चांक आहे.

उमेदवार वेबसाईटवरून किंवा फक्त येथे क्लिक करून प्रश्नपत्रिका 1 अंतिम अन्सर की डाउनलोड करू शकतात. जेईई मेन 2023 पेपर 1 च्या पहिल्या सत्रासाठी 8.6 लाखांहून अधिक उमेदवार होते. ज्यापैकी 2.6 लाख मुली आणि 6 लाख मुले होती. एनटीएने जेईई मेन, एजन्सी आयोजित करण्यास सुरुवात केल्यापासून पेपर 1 साठी विद्यार्थी सर्वाधिक पसंती आणि उपस्थिती दर्शवतात असे अधिकार सांगतात. (हेही वाचा, MHT CET 2023 ची अधिकृत वेबसाइट लाँच; आता नोंदणी, अभ्यासक्रम, तारखा, परीक्षा तपशील सर्व काही एकाच ठिकाणी)

जेईई मुख्य निकाल 2023 कसा पाहाल?

jeemain.nta.nic.in या JEE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील JEE मुख्य निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.

आवश्यक लॉगिन तपशील प्रविष्ट करा

सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

जेईई मुख्य निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.

स्क्रिनवर दिसणारा निकाल तुम्ही डाउनलोड करु शकता. तसेच भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट सुद्धा घेऊ सकता.

JEE अंतिम तात्पुरती अन्सर की इथे पाहा

JEE मुख्य पेपर 1 ची परीक्षा 24, 25, 29, 30, 31, आणि 1 फेब्रुवारी 2023 रोजी दोन सत्रात घेण्यात आली होती. जेईई मेनचे टॉप 2,50,000 पात्रताधारक जेईई अॅडव्हान्स 2023 परीक्षेत बसण्यास पात्र असतील. निकालाच्या आधारे उमेदवार विविध एनआयटी, जीएफटीआय आणि इतर जेईई मेन सहभागी संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.