एनटीए (NTA) कडून जेईई मेन पेपर 2 चा निकाल (JEE Main Paper 2 Results) जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार, BArch आणि BPlanning साठी ते प्रवेश घेऊ शकतात. यंदा फेब्रुवारी आणी सप्टेंबर महिन्यात परीक्षा पार पडणार आहेत. दोन्ही अटेम्प्ट मध्ये एकूण 96236 जणांनी रजिस्ट्रेशन केले होते तर त्यापैकी 65015 जण परीक्षेला सामोरे गेले होते. यामध्ये 5 जणांनी 100 % गुण मिळवले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल jeemain.nta.nic.in या वेबसाईट वर पाहता येणार आहे. निकालामध्ये रॅन्क देखील जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही सेशन दिलेल्यांनामध्ये सर्वोत्तम रॅन्क विचारात घेतला जाणार आहे.
JEE MAIN PAPER 2 मधील टॉपर्स कोण?
- बी अनंथा कृष्णन (तामिळनाडू) -BArch
- नोहा सॅम्युअल (जम्मू कश्मीर) BArch
- जोसुला व्यंकटा आदित्य (तेलंगणा) BArch
- जाधव आदित्य सुनील (महाराष्ट्र) BPlan
- ईश्वर बी (कर्नाटक) BPlan
भारतामध्ये यंदा जेईई मेन पेपर 2 ची परीक्षा दिलेल्यांमध्ये वरील पाच जणांना 100% गुण मिळाले आहेत.
तुमचा स्कोअर कसा पहाल?
- jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
- तुमचे क्रेडेंशिअल टाकून लॉगिन करा.
- तुमच्या स्क्रिन वर निकाल दिसेल तो डाऊनलोड करा.
ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळालं आहे त्यांना आता काऊंसलिंग राऊंडमधून प्रवेशाची जागा निश्चित करावी लागेल. यंदा पहिल्यांदा ही परीक्षा इंग्रजी, हिंदी सह अन्य 13 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच जेईई मेन परीक्षेचा निकाल देखील जाहीर झाला होता. त्यामध्ये एकुण 44जणांना 100% गुण मिळाले आहेत. तर 18 जण पहिल्या स्थानावर आहेत.