आयआयटी प्रवेश 2021 (IIT Admission 2021) साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर (JEE Advanced Result 2021) झाला आहे. आयआयडी खडगपूर (IIT Kharagpur) द्वारा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटी खडगपूरची अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वरही या परीक्षेेचा निकाल आपण पाहू शकता. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 या दिवशी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर (Roll Number), रजिस्ट्रेशन नंबर (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) आवश्यक आहे. जाईई एडवान्स परीक्षचा निकाल पाहण्याची प्रक्रिया घ्या जाणून.
JEE Advanced Result 2021 कसा पाहाल?
- आगोदर jeeadv.ac.in हे संकेतस्थळ तुमच्या गुगल पेज अथवा तुमच्या आवडत्या कोणत्याही सर्च इंजिनवरुन ओपन करा.
- jeeadv.ac.in साईटवर ठळकरित्या दिसणाऱ्या रिजल्ट या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख भरा.
- आता तुमच्या स्क्रीनवर आपला निकाल दिसू शकेल.
- आपल्या निकालाची प्रत आपण डाऊनलोडही करु शकता आणि त्याची प्रिंटही काढू शकता.
(हेही वाचा, JEE Advanced Registration 2021: जेईई एंडवांस 2021 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज, जाणून संपूर्ण वेळापत्रक)
ट्विट
JEE (Advanced) 2021| Mridul Agarwal of IIT Delhi scores top rank; obtained 348 marks out of 360 marks. Kavya Chopra of IIT Delhi zone has topped in the female category with CRL 98. She obtained 286
marks out of 360.
— ANI (@ANI) October 15, 2021
जेईई एडवान्स परीक्षा 2021 निकाल जाहीर करण्यापूर्वी शेवटची उत्तर पत्रिका (Jee Advanced Answer Key 2021) जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि घेतलेले आक्षेप या सर्व गोष्टींचा विचार करुन ही शेवटची उत्तर पत्रिका जाहीर करण्यात आली. जोसा (JoSAA) ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निकाल जाहीर झाल्यानतंर सर्व विद्यार्थ्यांसाठी 16 ऑक्टोबरपासून चॉईस फीलिंग (Choice Filling) ऑप्शन सुरु होईल. त्याच्या पहिल्या टप्प्याची ऑलॉटमेंट 22 ऑक्टोबर, सकाळी 10 वाजता सुरु होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी ऑलॉटमेंट 24 ऑक्टोबर, सीट ऑलोटमेंट 27 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता होईल. 30 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन शुल्क भरणे आणि कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.