
The Indian Institute of Technology, आयआयटी कानपूर कडून JEE Advanced 2025 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ज्यांनी JEE Main 2025 उत्तीर्ण केली आहे ते आता जेईई अॅडव्हान्स साठी अर्ज करू शकतात. jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी अंतिम मुदत 2 मे 2025 आहे. अॅप्लिकेशन फी भरण्याची अंतिम मुदत 5 मे 2025 आहे. JEE Advanced 2025 परीक्षा यंदा 18 मे 2025 दिवशी घेतली जाणार आहे.
ही परीक्षा computer-based test असणार आहे. इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून ही परीक्षा दिली जाऊ शकते. या परीक्षेचं अॅडमीट कार्ड 11 मे 2025 पासून डाऊनलोड करता येणार आहे. JEE Mains 2025 Result Out: NTA कडून जेईई मेन सेशन 2 चा निकाल jeemain.nta.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स.
JEE Advanced 2025 साठी रजिस्टर कसं कराल?
- अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in ला भेट द्या.
- होमपेजवर registration link दिसेल त्यावर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्ही JEE Main application number (JEE Main 2025 candidates) किंवा login id (already registered candidates) ने करू शकता.
- आवश्यक तपशील भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- अॅप्लिकेशन फी भरा.
- एकदा तपशील तपासून पहा आणि सबमीट करा.
नोंदणी दरम्यान आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये इयत्ता १०वी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, इयत्ता १२वीची गुणपत्रिका, श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांगत्व प्रमाणपत्र, scribe request letter(लागू असल्यास), संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि ओसीआय/पीआयओ कार्ड यांचा समावेश आहे.
JEE Advanced 2025 चा निकाल 2 जून रोजी जाहीर होईल. जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी (JoSAA) 3 जूनपासून आयआयटी आणि इतर सहभागी संस्थांसाठी केंद्रीकृत समुपदेशन प्रक्रिया सुरू करेल. या वर्षी जोएसएए जागा वाटपाच्या सहा फेऱ्या आयोजित करण्याची अपेक्षा आहे.