JEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
Union Education Minister Dharmendra Pradhan (Photo Credits: ANI)

जेईई अॅडव्हान्स 2021 (JEE Advanced 2021) ची परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी दिली आहे. या परीक्षा कोविड नियमांचे (Covid19 Protocols) पालन करुन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी जेईई ची ही परीक्षा 3 जुलै 2021 रोजी होणार होती. परंतु, कोरोना संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अखेर आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (JEE (Main) 2021 Session 4 Exam Date: जेईई मेन चौथ्या सत्राच्या परीक्षा तारखेत बदल;नोंदणी साठी 20 जुलै पर्यंत मुदतवाढ)

जेईई परीक्षेच्या रजिस्ट्रशन, अॅपलिकेशन, पात्रता आणि परीक्षा पद्धती बद्दलची माहिती जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी jeeadv.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. दरम्यान, भारतातील आयआयटीच्या एकूण 23 इंस्टीट्यूटमध्ये इंजिनियरिंग, सायन्स आणि आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेतली जाते. जेईईच्या मेन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांने टॉप 2.50 लाखांमध्ये येणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतात.

ANI Tweet:

गेल्या वर्षभरापासून देशातील कोविड-19 संकटामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे जेईई अॅडव्हान्स 2021 च्या परीक्षा पद्धतीत देखील बदल करण्यात आला आहे. 2020 च्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी कोविडमुळे गैरहजर राहिलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स 2021 ची परीक्षा देऊ शकतात. या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2021 ची परीक्षा देण्याची गरज नाही.