कोरोना संकटामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे तीन-तेरा वाजले आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना संकटाच्या दुसर्या लाटेमुळे जेईई परीक्षेची काही सत्रं लांबणीवर टाकण्यात आली होती त्यापैकी चौथ्या सत्राच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. NTA कडून काल त्याबाबत एक नोटीफिकेशन जारी करत माहिती देण्यात आली आहे. आता जेईई मेन 2021 चौथ्या सत्राची परीक्षा (JEE (Main) 2021 Session 4) 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधी मध्ये पार पडणार आहेत. तर या परीक्षेसाठी नोंदणी करिता 20 जुलै पर्यंत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करत यंदा परीक्षेला सामोरे जाणार्या अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
जेईई तिसरे आणि चौथे सत्र यामध्ये किमान महिन्याभराचा वेळ मिळावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती आता ती मान्य करण्यात आली आहे. एनटीए ने 4 आठवड्यांनी चौथे सत्र पुढे ढकलले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसात आता जेईई परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान 20-27 जुलै मध्ये तिसर्या सत्राच्या परीक्षा होतील त्याचं अॅडमीट कार्ड काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले आहे. JEE Main 2021 परीक्षेच्या तिसर्या सत्रासाठी Admit Card जारी; इथे पहा डाऊनलोड कसं कराल?
जेईई मेन 2021 चौथ्या सत्राच्या महत्त्वाच्या तारखा आणि माहिती
परीक्षा तारखा - 26, 27 व 31 ऑगस्ट तसेच 1 आणि 2 सप्टेंबर 2021
नोंदणीची अंतिम मुदत - 20 जुलै 2021
परीक्षेचं स्वरूप - ऑफलाईन (पेन-पेपर मोड)
हेल्पलाईन नंबर - 01140759000
JEE (Main) 2021 Session 4 rescheduled pic.twitter.com/zMkRIVwfsQ
— National Testing Agency (@DG_NTA) July 15, 2021
दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7.32 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे.