JEE Advanced 2020 Admit Card Released: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा साठी अ‍ॅडमीट कार्ड जारी; jeeadv.ac.in वरून असं करा डाऊनलोड
Online | Photo Credits: Pixabay.com

द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली कडून आज ( 21 सप्टेंबर) यंदाच्या जेईई अ‍ॅडव्हान्स (Joint Entrance Examination (Advanced) 2020 exam)साठी अ‍ॅडमीट कार्ड त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच jeeadv.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या इच्छुक उमेदवारांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यांना आता jeeadv.ac.in या वेबसाईटवर त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स म्हणजेच हॉल तिकीट्स उपलब्ध करण्यात आली आहेत.

यंदाच्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी 27 सप्टेंबर दिवशी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारत देशातील सुमारे 23 आयआयटी मध्ये अकरा हजराहून अधिक जागांवर प्रवेश देण्याकरिता ही परीक्षा घेतली जाते.

जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चं अ‍ॅडमीट कार्ड कसं डाऊनलोड कराल?

  • जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चं अ‍ॅडमीट डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर होम पेज वर प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांना लॉगिंग पेज वर रिडिरेक्ट केले जाईल.
  • विद्यार्थ्यांना जेईई मेन अ‍ॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड, सिक्युरिटी पिन, दिल्यानंतर साईन ईन करता येईल.
  • view/download JEE (Advanced) Admit Card 2020 या पर्यायावर क्लिक करा.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅडमीट कार्डची प्रिंट आऊट देखील काढता येणार आहे.

जेईई अ‍ॅडव्हान्सच्या अ‍ॅडमीट कार्डवर तुम्हांला विद्यार्थ्यांचं नाव, फोटो, साईन, रोल नंबर या सोबतच एक्झाम सेंटरचं नाव आणि पत्ता याची माहिती देखील पाहता येऊ शकते.

दरम्यान यंदा कोरोनाच्या दहाशतीखाली परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनातही भीती आहे. ज्यांना मनाजोग्या आयआयटीमध्ये प्रवेश हवा आहे, ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स साठी तयारी करतात. दरम्यान अन्य विद्यार्थी 12वीचे मार्क्स आणि सीईटीचे मार्क्स यांच्या माध्यमातूनच जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात.