प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

राज्यात 29 मे रोजी आयटीआयटी (ITI) ची परीक्षा पार पडली होती. मात्र प्रशासनाच्या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. मंडळाने झालेल्या चुकीची दखल घेत पुन्हा एकदा आयटीआयची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्याने 26 जून रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या ऍप्रेंटिसच्या गुणांची ऑनलाईन नोंदणी न झालेल्या 450 ते 500 विद्यार्थ्यांना 29 मे रोजी झालेली आयटीआयची लेखी परीक्षा देता आली नव्हती.

दादर आयटीआयमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये ऍप्रेंटिस करत आहेत. मंडळाने जाहीर केल्यानुसार 29 मे रोजी लेखी परीक्षा तर 7 जून रोजी प्रॅक्टिकल परीक्षा होणार होती. मात्र तारीख जवळ आली तरी या विद्यार्थ्यांचे ऍप्रेंटिसचे गुण ऑनलाईन झळकले नाहीत. त्यमुळे या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही मिळाले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही काही घडले नाही. शेवटी या विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. (हेही वाचा: MHT CET 2019 Result आज जाहीर होण्याची शक्यता, mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा निकाल)

शिवसनेने याबाबत लक्ष घातल्यावर, आपली चूक लक्षात येऊन केंद्रीय मंत्रालयाने या विद्यार्थ्यांसाठी नव्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. आता 3 जूनपर्यंत ऍप्रेंटिसच्या गुणांचे ऑनलाईन नोंदणी होईल.

अशा आहेत नव्या तारखा –

हॉलतिकीट डाऊनलोड – 7 जूनपासून पुढे

मॉक टेस्ट प्रॅक्टिस सेशन – 7 जूनपासून पुढे

इंजिनीयरींग ड्रॉईंग – 11 जून

प्रॅक्टिकल परीक्षा – 12 ते 14 जून

थेअरी विषयांची ऑनलाईन परीक्षा – 26 ते 28 जून