MHT CET 2019 Result जून च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता, mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा निकाल
महाराष्ट्रामध्ये 2 मे ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली आहे. यापूर्वी मंडळाने 22 मे दिवशी Answer Key जाहीर केली असून त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या.
MHT CET 2019 Result Date: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ( MHT CET) निकाल 2019 जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. बारावी (HSC Result)निकालानंतर आता इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा आहे. मंडळाची अधिकृत वेबसाईट mhtcet2019.mahaonline.gov.in वर हा निकाल पाहता येऊ शकतो. महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल जाहीर; आता SSC चा रिझल्ट लवकरच
कुठे व कसा पहाल निकाल?
- mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर तुम्ही निकाल पाहू शकाल.
- download MAH CET 2019 result अशा टॅबवर क्लिक करा.
- तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल
- आवश्यक माहिती एन्टर केल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो.
- MAH CET 2019 result ची मेरीट लिस्ट तुम्हांला डाऊनलोड करण्याची सोय आहे.
महाराष्ट्रामध्ये 2 मे ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली आहे. यापूर्वी मंडळाने 22 मे दिवशी Answer Key जाहीर केली असून त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार 20 प्रश्नांना आव्हान देण्यात आलं आहे. info.mahacet.org या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2019 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

