Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात 249 पदांसाठी भरती; 'असा' करा अर्ज
Government Jobs 2023 | (File Photo)

Indian Navy Recruitment 2023: देशसेवेची तळमळ असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाने नागरी कर्मचारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख नोंदणीच्या सुरुवातीच्या तारखेपासून 28 वा दिवस आहे.

शैक्षणिक पात्रता -

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचे मॅट्रिक किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (हेही वाचा - Employment News: केंद्र सरकारच्या 78 विभागांमध्ये 9.79 लाखांहून अधिक रिक्त पदे; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती)

वयोमर्यादा -

अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया -

निवड प्रक्रियेमध्ये अर्जांची छाननी करून उमेदवारांची शॉर्टलिस्ट करणे आणि त्यानंतर लेखी परीक्षा यांचा समावेश होतो. भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या लेखी परीक्षेत बसावे लागेल. परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल.

अर्ज शुल्क -

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 205 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/ माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उमेदवार नेट बँकिंग किंवा व्हिसा/ मास्टर/ रुपे क्रेडिट/ डेबिट कार्ड/ UPI द्वारे अर्ज फी भरू शकतात. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.