आगामी शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रम आणि तास कमी करण्याबाबत विचार सुरू;  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती
Students Representative image (PC - Wikimedia Commons)

भारतामध्ये वाढता कोरोनाचा धोका पाहता आता सरकार येत्या शैक्षणिक वर्षामध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. दरम्यान आगामी वर्षामध्ये शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रम कमी करण्यासोबतच शाळांमधील तासदेखील कमी होण्याची शक्यता आहे. अशी माहिती आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal)  यांनी दिली आहे. CBSE Board Exam 2020 Results: सीबीएसई बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षांचा निकाल 15 ऑगस्ट पर्यंत लागण्याची शक्यता.

मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. दरम्यान मागील 6 दिवसांपासुन सातत्याने कोरोनाबाधितांचा 24 तासांमधील नव्या रूग्णांचा आकडा हा 9 हजारांच्या पार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता विद्यार्थ्यांना अद्याप शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांच्या पुन्हा सुरू करण्याच्या तारखा देण्यात आलेल्या नाहीत. जुलै महिन्यात सरकार आढावा घेऊन त्याबाबत पुढील निर्णय घेणार आहे. मात्र आता शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम आणि तासिकांच्या वेळेमध्ये कपात होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ANI Tweet

शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यांच्या शिक्षण सचिवांनी विद्यार्थांचे आरोग्य व सुरक्षा, शाळांमधील स्वच्छता संबंधी उपाय आणि ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाशी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान यानंतर आता  डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. देशामध्ये लॉकडाऊनचा 5वा आणि अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. 30 जून पर्यंत काही अटी-शर्थींवर सेवा लॉकडाऊन शिथिल झाला आहे. मात्र शाळांबद्दल अद्याप निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.