प्रतिकात्मक फोटो (File Photo)

आयडीबीआय (IDBI) बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नसल्यास त्याबाबत अधिक माहिती घ्या. कारण या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2019 ठेवण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर आणि पदव्युत्तर करणे अत्यावश्यक आहे. तसेच उमेदवाराच्या योग्यते नुसार त्यांची निवड करण्यात येणार आहे.बँकेत रिक्त जागांवर विविध पदांसाठी योग्यता ठरवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही या पदासाठी अर्ज करणार असल्यास अधिकृतरित्या झळकवण्यात आलेल्या पत्रकावरील सर्व सुचना वाचा. या नोकरीसाठी एकूण 61 जागांवर भरती करण्यात येणार आहे. तर जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

-अॅग्रीकल्चर ऑफिसर ए पदासाठी ICAR मान्यताप्राप्त अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमधून कमीतकमी 60 टक्के गुण असणे अत्यावश्यक आहे.

-फॅकल्टी बिहेव्हिअर सायन्ससाठी सायकॉलॉजी पदासाठी एमबीए केलेले असावे.

-फ्रॉड रिक्स मॅनेजमेंट, फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट इन्वेस्टीगेटर पदासाठी कमीतकमी 60 टक्के गुण आणि बी कॉम केलेले असावे.

या पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षापर्यंत असावे. तसेच उमेदवारांना आयडीबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरुन किंवा https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.asp येथे अधिक माहिती मिळू शकणार आहे.

तसेच  BHEL या कंपनीत 10 वी पासआणि ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये 305 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.  ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत फिटर, मेकॅनिक, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्टमॅन, कारपेंटरसह अन्य पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क स्विकारण्यात येणार नाही आहे.