ICSI CS Result June 2021: जून सत्राचा निकाल 13 ऑक्टोबरला होणार जाहीर; जाणून घ्याicsi.edu वर कसे पहाल तुमचे गुण
निकाल। File image

Institute of Company Secretaries of India कडून यंदा झालेल्या जून महिन्यातील CS परीक्षांचा निकाल 13 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमांचा Professional Programme, Executive Programme आणि Foundation Programme परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांचे निकाल ऑनलाईन निकाल icsi.edu या अधिकृत संकेतस्तळांवर पाहता येणार आहेत.नक्की वाचा: ICSI CS June 2021 Exam चं वेळापत्रक Icsi.edu वर जाहीर; इथे पहा नव्या, जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या तारखा.

यंदा कोविड 19 संकटामुळे जून 2021 मधील परीक्षा थोडी पुढे ढकलण्यात आली होती. फाऊंडेशन परीक्षा 13,14 ऑगस्टला आणि 11,12 सप्टेंबरला झाल्या असून त्याचा निकाल 13 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. तर प्रोफेशनल आणि एक्झिक्युटीव्ह परीक्षा 10 ते 20 ऑगस्ट 2021 दरम्यान पार पडल्या त्यापैकी प्रोफेशनल चे निकाल दुपारी 11 वाजता आणि एक्झिक्युटीव्ह चे निकाल दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहेत. इथे पहा निकालाची नोटीस .

ICSI CS Result डाऊनलोड कसा कराल?

  • अधिकृत संकेतस्थळ icsi.edu ला भेट द्या.
  • होमपेजवर रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
  • आता रोल नंबर आणि नाव यांची माहिती भरा.
  • सबमीट वर क्लिक करा आणि तुमचा निकाल पहा.
  • विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासोबतच डाऊनलोड करण्याचा देखील पर्याय देण्यात आला आहे.

यंदा एक्झिक्युटीव्ह आणि फाऊंडेशन परीक्षांच्या निकालाच्या प्रती ICSI कडून ऑनलाईन स्वरूपातच दिल्या जातील. त्याची फिजिकल कॉपी दिली जाणार नाही. नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रोफेशनल प्रोग्रॅमचे निकाल मात्र फिजिकल कॉपीच्या स्वरूपात दिले जातील. जर निकालाची प्रत मिळाली नाही तर exam@icsi.edu वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आता एक्झिक्युटीव्हआणि प्रोफेशनल कोर्स मध्ये नव्या,जुन्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात 21 ते 30 मध्ये होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन मोड मध्ये होईल. 14 ऑक्टोबर पासून त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.