File image of school children | (Photo Credits: PTI)

ICSE,ISC Board Exams 2020 Dates: जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता भारतभर पसरला आहे. परदेशातून येणार्‍या नागरिकांमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने त्याचा संसर्ग देशाच्या कानाकोपर्‍यांमध्ये पसरू म्हणून गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रामुख्याने वयोवृद्ध आणि लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे देशा-परदेशात सुरू असलेल्या ICSE,ISC Board Exams 2020 च्या 10,12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याआहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर शहरात कलम 144 लागू आहे. त्यामुळे आता 31 मार्च परीक्षा शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सीबीएसई म्हणजेच केंद्रीय विद्यालयांच्या बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तर आता त्यापठोपाठ ICSE,ISC Board Exams 2020 च्या 19 ते 31 मार्च पर्यंतच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. लवकरच नवं वेळापत्रक जारी केलं जाईल अशी माहिती संबंधित मंडळाने दिली आहे.

सध्या भारतामध्ये 169 कोरोनाग्रस्त रूग्ण असून त्यापैकी सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. राज्यात COVID19 च्या रूग्णांची संख्या 47 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन, आरोग्य संस्था यांच्याकडून कडक पावलं उचलली जात आहेत. COVID-19: भारतात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन आकडा 166 वर पोहचला

शाळा, कॉलेज प्रमाणे देशात महत्त्वाची देवस्थानं बंद करण्यात आली आहेत. खाजगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' चे आदेश देण्यात आले आहेत. आज रात्री 8 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत.