काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन बोर्ड आयसीएसई (10 वी इयत्ता) आणि आयएससी (12 वी इयत्ता) यांची राहिलेल्या पेपरांची परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. 1 मे रोजी शुक्रवारी सीआयएससीईने एक प्रेसनोट जाहिर करत असे म्हटले आहे की, लॉकडाउनच्या काळात सरकारच्या निर्देशनानुसार परीक्षा आयोजित केली जाणार आहे. मात्र जेव्हा परीक्षा सुरु होईल ती सहा ते आठ दिवसात पूर्ण केली जाणार आहे. परीक्षा दररोज असणार असून विद्यार्थ्यांना रविवारी आणि शनिवारी सुद्धा परिक्षेसाठी हजर रहावे लागणार आहे.परीक्षा सुरु होण्यापूर्वी सात ते आठ दिवस आधी विद्यार्थ्यांना त्याबाबत सांगितले जाणार आहे. यासंबंधित माहिती प्राचार्यांना ई-मेल आणि सीआयएससीईच्या करियर पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या आठ दिवसात प्राचार्य राहिलेल्या विषयांच्या परिक्षांची तयारी करणार आहेत. परिक्षार्थ्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी परीक्षेसाठी तयारी करावी. दरम्यान, कोरोनाचे देशावरील संकट पाहता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 10 वीच्या सहा आणि 12 वीच्या आठ पेपरांची परीक्षा अद्याप राहिली आहे.
सीआयएससीईने असे सांगितले आहे की, 10 वी आणि 12 वी इयत्तेची परीक्षा संपल्यानंतर सहा ते आठ दिवसात त्याचे निकाल जाहीर करणार आहेत. दहावीच्या भुगोल, एचसीजी, बायोलॉजी, इकोनॉमिक्स, हिंदी आणि आर्ट या विषयांची परीक्षा राहिली आहे. तर 12 वी इयत्तेची बायोलॉजी, बिझनेस स्टडीज, भुगोल, सोशियोलॉजी, होम सायन्स, इंग्रजी आणि आर्ट या विषयांचा पेपर होणे बाकी आहे.(Lockdown: 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात काय सुरू राहणार? काय बंद राहणार? जाणून घ्या)