ICSE, ISC 2024 Date Sheet: 10वी, 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा cisce.org वर जाहीर; कसं पहाल टाईम टेबल!
Students writing an exam, File photo

काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कडून ICSE आणि ISC 2024 बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. ICSE म्हणजे दहावी आणि ISC म्हणजे 12वीच्या परीक्षांच्या तारखा विद्यार्थी CISCE ची अधिकृत वेबसाईट cisce.org वरून डाऊनलोड करू शकतात. ICSE, 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान होणार आहे तर ISC, 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12 फेब्रुवारी ते 2 एप्रिल मध्ये होणार आहे.

अधिकृत नोटिफिकेशननुसार, ICSE आणि ISC बोर्ड परीक्षांचे निकाल मे 2024 मध्ये जाहीर केले जाणार आहेत. दोन तासांची परीक्षा असणार असून सकाळी 11 वाजता ती सुरू होईल. मात्र 29 फेब्रुवारी, 1, 7, 13, 16, 20, आणि 28 मार्च दिवशीची परीक्षा 3 तासांची आहे. सकाळी 9 वाजल्यापासून परीक्षा सुरू होणार आहे.

ICSE आणि ISC बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक कसे कराल डाऊनलोड?

  • अधिकृत वेबसाईट cisce.org ला भेट द्या.
  • होमपेजवर "Notice Board"सेक्शन वर क्लिक करा. आता नोटीस बोर्ड वर "Time Table of ICSE Year 2024 Examination" (दहावी साठी) आणि "Time Table of ISC Year 2024 Examination"(बारावी साठी) आहे त्यावर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर वेळापत्रक समोर येईल. ते डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.

आता वेळापत्रक जारी झाल्यानंतर परीक्षेपूर्वी बोर्डाकडून अशाचप्रकारे अधिककृत वेबसाईट वर अ‍ॅडमीट कार्ड्स देखील जारी केली जातील. परीक्षेला जाताना ही अ‍ॅडमीट कार्ड्स घेऊन जाणं आवश्यक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्याचे अपडेट्स देखील cisce.org वर पाहता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी 15 मिनिटं अधिकची ही फक्त पेपर वाचायला दिली जातात. 10.45 ला पेपर वाटायला सुरूवात केली जाते. पेपर लिहायला सुरूवात 11 वाजता केली जाईल.