The Institute of Chartered Accountants of India कडून नोव्हेंबर महिन्यात होणार्या ICAI CA परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. अधिकृत वेबसाईट icai.org वर विद्यार्थ्यांना परीक्षा तारखा पाहता येणार आहे. या वेळापत्रकानुसार, Final course examination for Group 1 ची परीक्षा 1,3 आणि 5 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. तर ग्रुप 2 ची परीक्षा 7,9 आणि 11 नोव्हेंबरला होणार आहे. The International Taxation- Assessment Test यंदा 9 आणि 11 नोव्हेंबर 2024 ला होणार आहे. The Insurance and Risk Management (IRM) Technical examination ही 5,7,9 आणि 11 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान अंतिम परीक्षेचा 1 ते 5 पेपर आणि Insurance and Risk Management (IRM) Technical Examination हे प्रत्येकी तीन तासांचे असणार आहेत. सहावा पेपर आणि International Taxation – Assessment Test चे सारे पेपर चार तासांचे असणार आहेत. Free Higher Education For Girls: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या OBC, EWS आणि SEBC मुलींना मोफत शिक्षण; राज्य शासनाचा मोठा निर्णय.
ICAI CA November Exam Schedule 2024 कसे कराल डाऊनलोड?
- अधिकृत वेबसाईट icai.org ला भेट द्या.
- होमपेजवर, latest announcement link च्या खाली ICAI CA November Exam Dates 2024 वर क्लिक करा.
- आता तुमच्या स्क्रिनवर ICAI CA November Exam Schedule 2024 दिसेल.
- तुम्हांला या वेळापत्रकाची प्रिंट आऊट काढून ठेवता येऊ शकते.
CA परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची मुदत 20 ऑगस्ट रोजी संपेल. 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान एक दुरुस्ती विंडो उपलब्ध असेल. नोव्हेंबर 2024 च्या परीक्षा आठ परदेशी शहरांमध्येही घेतल्या जाणार आहे. यासाठी अबू धाबी, बहरीन, थिम्पू (भूतान), दोहा, दुबई, काठमांडू (नेपाळ), कुवेत आणि मस्कत मध्येही परीक्षा केंद्र असणार आहेत. अंतिम परीक्षेसाठी उमेदवार त्यांच्या पेपरची उत्तरे इंग्रजी किंवा हिंदीमध्ये देऊ शकतात.