Free Higher Education For Girls: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ओबीसी, इडब्ल्यूएस आणि एसइबीसी विद्यार्थ्यांना विशेष संधी आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत मिळणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के लाभ मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे.

यासह बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही 100 टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 ऑक्टोबर 2017 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. (हेही वाचा: Agniveer Scheme: शहीद अंशुमन सिंग यांच्या आईला आवडली नाही अग्निवीर योजना; म्हणाल्या- 'सरकारने राहुल गांधींचे भाषण ऐकावे')

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)