Agniveer Scheme: शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या शौर्याची सध्या देशभर चर्चा होत आहे. देवरियाचे शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांना त्यांच्या हौतात्म्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्राने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. सिंग यांची पत्नी स्मृती आणि आईने राष्ट्रपतींकडून हा कीर्ती चक्र पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर मंगळवारी रायबरेलीचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांचे वडील रवी प्रताप सिंग आणि त्यांची आई मंजू सिंग यांची भेट घेतली. राहुल गांधी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ रायबरेलीच्या दौऱ्यावर आहेत.

राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर शहीद कॅप्टन अंशुमनची आई मंजू सिंह म्हणाल्या, 'देशातील सैन्याबद्दल, विशेषतः अग्निवीर योजनेबद्दल आमची चर्चा झाली. ही योजना आणखी चांगली होऊ शकते. देशात दोन प्रकारचे सैन्य नसावे. अग्निवीर योजनेचा सरकारने विचार करावा. मी सरकारला आवाहन करतो की, या योजनेत खूप बदल व्हायला हवेत. त्यांनी राहुल गांधींचे भाषण ऐकायला हवे. सैनिक होण्यासाठी खूप बलवान असायला हवे आणि ही योजना फक्त चार वर्षांची आहे. त्यानंतर त्या सैनिकाचे काय? त्याचे खूप नुकसान होईल. चार वर्षानंतर सगळे संपून जाईल. त इथले सगळे संपेल.’ (हेही वाचा: Chhattisgarh: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार; या वर्षात आतापर्यंत 139 नक्षलवादी ठार)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)