The Institute of Chartered Accountants of India अर्थात ICAI कडून नोव्हेंबर महिन्यात होणारी CA Final November exams आता पुढे ढकलण्यात आली आहे. दिवाळी असल्याने परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती एका नोटिफिकेशन मधून icai.org वर देण्यात आली आहे. तसेच परीक्षेच्या नव्या तारखेची देखील माहिती देण्यात आली आहे. यंदा भारतामध्ये 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी केली जाणार आहे.
आधीच्या वेळापत्रकानुसार, ग्रुप 1 ची परीक्षा 1,3,5 नोव्हेंबरला होती तर ग्रुप 2 ची परीक्षा 7,9,11 नोव्हेंबरला होती. त्यामध्ये आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बदल करत ग्रुप 1 ची परीक्षा 3,5,7 नोव्हेंबर आणि ग्रुप 2 ची परीक्षा 9, 11, 13 नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांना अॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. आता नव्या तारखेमध्ये कोणतीही सरकारी सुट्टी जाहीर झाली तरीही त्यानुसार परीक्षेत बदल होणार नसल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन .
INTT-AT, IRM कोर्स परीक्षेच्या तारखांमध्ये बदल नाही
ICAI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट (INTT-AT) आणि इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट (IRM) तांत्रिक परीक्षेतील चार्टर्ड अकाउंटंट पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ही परीक्षा 9 आणि 11 नोव्हेंबर आणि 5, 7, 9 आणि 11 नोव्हेंबर 2024 या आधीच नियोजित तारखांना होईल. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वेळोवेळी माहिती घेता येणार आहे.
अलीकडे, ICAI ने दिलेल्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची विंडो आणखी दोन दिवसांसाठी पुन्हा उघडली होती. उमेदवारांना 11 आणि 12 सप्टेंबर रोजी 600 रुपये विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्याची परवानगी दिली होती.