ICAI CA 2019 Revised Exam Dates:  सीए परीक्षांचं नवं वेळापत्रक icai.org वर जाहीर; 19, 20 नोव्हेंबरला होणार 'या' विषयांच्या परीक्षा
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

ICAI CA 2019 Exam Dates:   इंस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) कडून 9 आणि 11 नोव्हेंबर दिवशी घेण्यात येणार्‍या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या अयोद्धा प्रकरणी सुनावणीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता ICAI CA Final Exam चं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आलं आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 19 आणि 20 नोव्हेंबर दिवशी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नवं वेळापत्रक ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.org वर अपडेट करण्यात आलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सीए फायनल, सीए इंटर किंआ फाऊंडेशनच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांनी हे नवं वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर पाहणं गरजेचे आहे.

19 नोव्हेंबर 2019 दिवशी कोणत्या परीक्षा असतील?

ICAI च्या नोटीफिकेशननुसार, आता आईसीएआई कडून सीए फाउंडेशन, फाइनल आणि इंटरमीडिएट किंवा आईपीसी ची परीक्षा तारीख बदलली आहे. नव्या बदलांनुसार, फाउंडेशन पेपर वन (Principles and Practices of Accounting), फायनल ओल्ड स्कीम ग्रुप 2, पेपर 5 (Advanced Management Accounting), फायनल न्यू स्कीम ग्रुप 2 पेपर 5 (Strategic Cost Management and Performance Evaluation), IRM टेक्निकल एक्झामिनेशन पेपर 1 (Principles and Practice of Insurance.), INTT पेपर 1 (International Tax and Transfer Pricing) या विषयाच्या परीक्षा पूर्वी 9 नोव्हेंबर 2019 दिवशी होणार होत्या. आता या परीक्षा 19 नोव्हेंबर 2019 दिवशी घेतल्या जाणार आहेत.

20 नोव्हेंबर 2019 दिवशी कोणत्या परीक्षा असतील?

IPC ओल्ड स्कीम, ग्रुप 2 पेपर 5 (Advanced Accounting), IPC न्यू स्कीम ग्रुप 2 पेपर 5 (Advanced Accounting) या विषयांच्या परीक्षा 11 नोव्हेंबर 2019 दिवशी होणार होत्या आता त्या 20 नोव्हेंबर 2019 दिवशी होणार आहेत.

याशिवाय अन्य कोणत्याच परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. त्याचे अपडेट्स वेळोवेळी अधिकृत वेबसाईट्सवर दिले जात आहेत. ICAI CA admit कार्डस ही नव्या वेळापत्रकानुसार होणार्‍या परिक्षांसाठी ग्राह्य मानले जाणार आहे. तसेच परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्र देखील पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच राहणार आहे.