HC Recruitment 2022: बाॅम्बे हायकोर्टात नोकरीच संधी, 27 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज
Bombay High Court | (Photo Credits: ANI)
HC Recruitment 2022:  बाॅम्बे हायकोर्टाने महाराष्ट्र राज्याच्या न्यायिक सेवेत जिल्हा न्यायधीशांच्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, योग्य आणि इच्छुक उमेदवारांना 27 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. हायोकोर्टाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, 9 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.(शैक्षणिक संस्थांनी DigiLocker प्लॅटफॉर्मवरील विद्यार्थ्यांची पदवी, गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे मान्य करावीत-UGC) 

उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून लाॅ ची डिग्री घेतलेली असावी. कमीच कमी सात वर्ष उच्च न्यायालयात किंवा त्यासंबंधित न्यायलयात वकील पदाची प्रॅक्टिस केलेली असावी. तसेच उमेदवाराला मराठी भाषा सुद्धा माहिती असावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पहावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वयं 35-45 वर्षापर्यंत असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आरक्षित वर्गासाठी 500 रुपये आणि अनारक्षित वर्गासाठी 1 हजार रुपये शुल्क भरावा लागणार आहे.(Maharashtra Scholarship Result 2021: 5वी, 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; mscepuppss.in वर असा पहा स्कोअर)

महत्त्वपूर्ण माहिती

>>ऑनलाइन अर्ज जमा करणे प्रारंभ: 7 जानेवारी 2022

>>ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: 27 जानेवारी 2022

>>डिस्ट्रिक्ट जज - 9 पद

इच्छुक उमेदवारांनी 27 जानेवारी 2022 च्या संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट सुद्धा घ्यावी.