
HAL Recruitment 2021: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदावर नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार नर्स, फिजियोथेरेपिस्ट, फार्मेसिस्ट आणि ड्रेसरच्या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. अशातच ज्या उमेदवारांना या पदावर ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत वेबसाइट hal-india.co.in येथे भेट द्यावी. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, 14 डिसेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अखेरच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत.(NU Winter Exams 2021 Dates: नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 25 नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता; इथे पहा अंतरिम वेळापत्रक)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तो नीट वाचून घ्यावा. कारण अर्जात कोणताही चुक झाल्यास तो पुन्हा स्विकारला जाणार नाही आहे. तर जाणून घ्या या नोकर भरती संदर्भात महत्वाची माहिती.(Economically Backward Class: आरक्षणासाठी EWS वर्गाच्या वार्षीक उत्पन्नसीमेवर होणार पुनर्विचार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती)
>>ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 24 नोव्हेंबर 2021
>>ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 14 डिसेंबर 2021
>>पद भरती अधिक माहिती
-स्टाफ नर्स: 7
-साइकोथेरेपिस्ट: 01
-फार्मेसिस्ट: 01
-ड्रेसर: 01
स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरी (3 वर्ष) मध्ये डिप्लोमा केलेला असावा. तर साइोथेरेपिस्टच्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फिजियोथेरेपी (2 वर्ष) मध्ये डिप्लोमासह पीयुसी (पीसीबी) असावे.
यासाठी युआर/ओबीसी उमेदवारांना 200 रुपये शुल्क द्यावा लागणार आहे. तर एससी/एसटी/पीडब्लूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीत. या संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.