NU Winter Exams 2021 Dates: नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 25 नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता; इथे पहा अंतरिम वेळापत्रक
Representational Image (Photo Credit: unsplash.com)

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या ( Exam and Evaluation Board of Nagpur University) बैठकीत झालेल्या शनिवार (20 नोव्हेंबर) च्या बैठकीत आगामी हिवाळी परीक्षा 2021 ( Winter Exams 2021 चं) तात्पुरतं/ अंतरिम वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अशा सार्‍यांच्या परीक्षा ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात यंदा 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात पार पडणार आहेत. 8 डिसेंबर पूर्वी या परीक्षांचे गुण गुप्त पद्धतीने नोंदवले जाणार आहेत.

कॉलेज स्तरावर लेखी परीक्षा 1 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन/ऑफलाईन स्वरूपात घेतली जाईल तर 18 डिसेंबर पूर्वी या परीक्षेचे देखील मार्क्स नोंदवले जाणार आहेत. पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या 2, 4, 6, 8 व 10 व्या सेमिस्टरमधील नापास झालेले आणि बाहेरून परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत होतील. तर लेखी परीक्षा विद्यापीठ स्तरावर 14 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 2 व 3 वर्षीय अभ्यासक्रमाच्या 3 आणि 5 व्या सेमिस्टरच्या प्रात्यक्षिक परीक्षा 10 ते 15 जानेवारी दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होतील. याच अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन पद्धतीनं 17 ते 29 जानेवारीपर्यंत आयोजित केल्या जाणार आहेत.

थिअरी च्या इंटर्नल परीक्षा, प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट, सेमिनार, असाईनमेंट, तोंडी परीक्षा या अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.