फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Food Corporation Of India) मध्ये मोठ्या संख्येने नोकर भरती करण्यात येणार आहे. देशातील विविध झोनमध्ये ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 113 जागांसाठी ही बंपर पदभरती करण्यात येणार आहे. जनरल (General), डेपो (Depo), मुव्हमेंट (Movement), अकाऊंट्स (Accounts), टेक्निकल (Technical), सिव्हिल इंजिनीअर (Civil Engineer), इलेक्ट्रीकल मॅकेनिकल इंजिनीअर (Electrical Mechanical Engineer), हिंदी (Hindi) अशा विविध विभागात मॅनेजर (Manager) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी 40 हजार ते 1 लाख 50 हजार या दरम्यान पगार दिल्या जाणार आहे. संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 28 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असावे. तरी या पदभरतीची अर्ज प्रक्रीया उद्यापासून म्हणजे 27 ऑगस्ट (August) पासून सुरु होणार आहे.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (Food Corporation Of India) पदभरतीबाबत अधिकृत वेबसाइटवर (Website) नोटिफिकेशन (Notification) प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता (educational Qualification), वयोमर्यादा (Age Limit), अनुभव (Experience), अर्जाची शेवटची तारीख (Last Date for Application) यांचा सविस्तर तपशील विस्तारीत रुपात वेबसाईटवर (Website) देण्यात आला आहे. 26 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना (Reserve Category Candidates) पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये (Age Limit) सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- BARC Job Recruitment: भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र आणि भाभा अणू संशोधन केंद्रात नोकरीची संधी)
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी 800 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तरी एससी (SC)/एसटी (ST)/पीडब्ल्यूबीडी (PWD) या प्रवर्गातील उमेदवारांना विनामुल्य अर्ज दाखल करता येईल. अर्ज पात्र ठरल्यास उमेदवाराची ऑनलाईन चाचणी (Online Test) घेण्यात येईल. ती चाचणी पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत (Interview) होईल आणि मुलाखतीतून निवड (Interview Selection) झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण घेण्यात येईल. प्रशिक्षण झाल्यानंतर उमेदवारास नोकरीवर रुजु होता येईल. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) (Cast Certificate), ओळखपत्र (Aadhar Card/ Licence) आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passport Photo) हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.