Ramesh Pokhriyal (Photo Credits-Twitter)

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Dr. Ramesh Pokhriyal Nishank) आज JEE Main 2021 dates जाहीर करणार आहे. त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजता ते अधिकृत माहिती देणार आहेत. यावेळेस ते विद्यार्थी Engineering entrance test साठी कितीवेळा बसू शकतात? याची देखील माहिती देतील. दरम्यान काल नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून JEE Main 2021 dates, नव्या परीक्षेचं स्वरूप याची माहिती देणारं पत्रक जाहीर करण्यात आलं होतं मात्र काही वेळातच ते मागे देखील घेण्यात आलं आहे. JEE Main 2021: जेईई मेन देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार परीक्षा.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ मेसेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचे आगामी परीक्षांसाठी दिलेल्या सूचना यांचे आभार मानले आहेत. आज सध्याकाळी 6 वाजता मी परीक्षा वेळापत्रक, परीक्षा देण्याचे अटेम्प्स याबद्दल माहिती देईन. ट्यून इन रहा. असं सांगितलं आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांचे ट्वीट

10 डिसेंबरला रमेश पोखरियाल यांनी वेबिनार घेत मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना एका पेक्षा अधिक वेळा परीक्षा देण्यासाठी पर्यायांचा सकारात्मक विचार सुरू आहे. काल मागे घेण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये 4 वेळेस परीक्षा देण्याचा विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान यंदा भारतात इंग्रजी सोबतच प्रादेशिक भाषांमध्येही जेईई मेन्स परीक्षा देता येणार आहे. यामध्ये हिंदी, आसामी, मराठी, मल्याळम, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू..ओडिया, कन्नड आदी भाषांचा समावेश आहे.