DigiLocker CBSE Results 2020: सीबीएसई बोर्डाकडून (CBSE Board) यंदाचा 12 वीचा निकाल 13 जुलै दिवशी जाहीर झाला आहे तर 15 जुलैला 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान यंदा सीबीएसईने विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून देखील त्यांची डिजिटल मार्कशीट, सर्टिफिकेट, स्किल सर्टिफिकेट, माइग्रेशन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. DigiLocker च्या माध्यमातून डाऊनलोड केली जाणारी ही सारी सर्टिफिकेट्स Information Technology Act, 2000 च्या अंतर्गत कायदेशीर आहेत. दरम्यान अॅप आणि वेबसाईट्स (digilocker.gov.in) माध्यमातून तुम्ही DigiLocker वापरू शकता. CBSE 10th Result 2020: आज सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल; cbsesresults.nic.in वर पहा तुमचा स्कोअर.
Department of Electronics and Information Technology (DeitY)या भारत सरकारच्या विभागाकडून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आता डिजिटली स्वाक्षरी असलेली मार्कशीट आणि इतर सर्टिफिकेट्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर ही उपलब्ध असतील तसेच ती डाऊनलोड करून प्रिंट देखील करता येऊ शकतात.
DigiLocker वर साईनअप करून मार्कशीट डाऊनलोड कशी कराल?
DigiLocker वर साईन अप करणं अगदी सोप्प आहे. याकरिता तुम्हांला मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे. अॅप डाऊनलोड किंवा ओपन केल्यानंतर युजरनेम, पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्ही देत असलेल्या मोबाईल क्रमांकांवर एक ओटीपी पाठवला जाईल. याद्वारा तुमचं डिजिलॉकर अकाऊंट बनवलं जाईल. तुमचं अकाऊंट बनल्यानंतर आवश्यक ती माहिती दिल्यानंतर तुम्हांला सहज कागदपत्र डाऊनलोड करता येतील.
दरम्यान यंदा सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल 88% लागला आहे. काही वेळातच 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.