सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (CTET)चं अॅडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आलं आहे. सीटीईटी अॅडमीट कार्ड्स ctet.nic.in वर उपलब्ध आहेत. ही अॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन डिटेल्स द्यावी लागणार आहेत. यंदा सीबीएसई (CBSE) कडून प्री अॅडमीट कार्ड्स मुख्य परीक्षेच्या अॅडमीट कार्ड्स पूर्वी जारी करण्यात आली आहेत. प्री अॅडमीड कार्ड्स (Pre Admit Cards) मध्ये उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची आणि तारखेची माहिती देण्यात आली होती. तर मुख्य अॅडमीट कार्ड्स मध्ये परीक्षा केंद्र आणि शिफ्ट यांची माहिती दिली आहे.
मेन एक्झाम अॅडमीट कार्ड परीक्षा तारखेच्या दोन दिवसांच्या पूर्वी जारी केलं जाणार आहे. सध्या 16-31 डिसेंबर दरम्यान होणार्या परीक्षेची अॅडमीट कार्ड्स जारी झाली आहेत. तर जानेवारी महिन्यात होणार्या परिक्षांची अॅडमीट कार्ड्स नंतर जारी केली जातील. असे सीबीएससी कडून परीक्षा घेणार्या संस्थेने सांगितले आहे. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट चं अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी या डिरेक्ट लिंक वर क्लिक करा.
CBSE CTET Admit Card 2021 कशी कराल डाऊनलोड
- अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ctet.nic.in ला भेट द्या.
- उमेदवारांना फेज 2 अॅडमिट कार्ड लिंक वर क्लिक करावं लागणार आहे.
- इथे क्रेडेंशिअल चा वापर करून लॉगिन करावं लागणार आहे.
- आता स्क्रिन वर तुमचं अॅडमीट कार्ड दिसेल.
- हे डाऊनलोड करून प्रिंट करा.
उमेदवार्यांच्या अॅडमीट कार्ड्स वर परीक्षेची तारीख आणि शिफ्ट नमूद केलेली असेल. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 12 या वेळेमध्ये परीक्षा देणार आहे. तर दुसरी शिफ्ट 2.30 ते 5 असणार आहे. यंदा परीक्षा स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. फॅक्च्युअल नॉलेज पेक्षा कन्सेप्श्युअल अंडस्टॅन्डिंग आणि अॅप्लिकेशन यावर अधिक भर दिला जाणार आहे.
यंदाच्या वर्षी परीक्षा ऑनलाईन मोड मध्ये घेतली जाणार आहे. आता सीबीएसई ने देखील परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याचं ठरवलं आहे.