द नॅशनल टेस्टिंग एजंसी (The National Testing Agency)कडून आज (14 फेब्रुवारी) Council of Scientific and Industrial Research National Eligibility Test जून 2021 चं अॅडमीट कार्ड जारी केले आहे. उमेदवारांना CSIR UGC-NET 2021 phase II परीक्षेचं अॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. हे अॅडमीट कार्ड csirnet.nta.nic.in वर जारी केले आहे. यासाठी परीक्षा 15,16,17 फेब्रुवारी दिवशी होणार आहे.
कोविड 19 नियमावलीचं पालन करून ही परीक्षा पार पडणार आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशीप आणि देशभरात विद्यापीठांमध्ये lectureship करणार्यांसाठी ही परीक्षा आहे. ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. हे देखील नक्की वाचा: इंटरव्यूमध्ये 50 वेळा नापास होऊनही Sampriti Yadav ने मानली नाही हार, शेवटी Google ने दिली 1 कोटींची नोकरी.
कसं डाऊनलोड कराल अॅडमीट कार्ड
- csirnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर “Download Admit Card for Joint CSIR UGC NET June 2021” वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे लॉगिन क्रेडेंशिअल सबमीट करावे लागतील.
- तुमच्या स्क्रिनवर SIR UGC-NET 2021 phase II चं अॅडमीट कार्ड दिसेल.
- आता हॉलतिकीट डाऊनलोड करण्याचा, प्रिंट काढण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे.
अॅडमीट कार्ड वर परीक्षा केंद्राचा पत्ता, रिपोर्टिंग टाईम आणि इतर माहिती उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी वेळोवेळी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आले आहे.