
Central Board of Secondary Education अर्थात सीबीएसई बोर्डाकडून यंदा दहावी, बारावी बोर्डाचे special exam schedule जारी केले आहे. फेब्रुवारी- एप्रिल महिन्यात जे सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी विविध खेळांच्या स्पर्धेसाठी सहभागी झाल्याने बोर्डाची परीक्षा देऊ शकले नाही त्यांना आता या परीक्षेला सामोरे जाता येणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना CBSE special exam schedule पाहता येणार आहे.
CBSE च्या विशेष परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, CBSE इयत्ता 10वीची परीक्षा 7 एप्रिल ते 11 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. सीबीएसई इयत्ता 12वी ची परीक्षा 11 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. विषयानुसार परीक्षा दिवसातून एकाच शिफ्टमध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 किंवा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 दरम्यान घेतल्या जातील. CBSE Class 10th Result 2025: सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा; cbse.gov.in वर पहा कशी पहाल मार्कशीट?
दहावी आणि बारावीच्या CBSE विशेष परीक्षेचे नवीन प्रवेशपत्र लवकरच जारी केले जाईल. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांचे सीबीएसई प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र आणावे. जे उमेदवार त्यांचे सीबीएसई हॉल तिकीट आणू शकणार नाहीत त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचावे आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 15 मिनिटे वाचनाचा वेळ मिळेल. इथे पहा सविस्तर वेळापत्रक .
सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल या कालावधीत होत आहेत. सीबीएसई बोर्डाचे निकाल साधारणपणे परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 40-45 दिवसांमध्ये जाहीर होईल. दहावी आणि बारावीचे निकाल मे 2025 मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. स्कोअरकार्ड जाहीर झाल्यानंतर ते जाहीर केले जातील आणि ते cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि results.cbse.nic.in वर उपलब्ध असतील.