
CBSE बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या आहेत आता विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतिक्षा आहे. लवकरच बोर्डाकडून हा निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा (CBSE Board Class 10th Exam) 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाल्या आहेत. त्यामुळे आता ऑनलाई माध्यमातून निकाल कधी रिलीज होणार? याची प्रतिक्षा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांचे गुण आणि ट्क्केवारी ऑनलाईन दाखवली जाते त्यामुळे कोठूनही विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाईट वर पाहता येईल. या वेबसाईट वर निकाल पाहण्यासाठी त्यांना रोल नंबर, स्कूल नंबर, जन्मतारीख असे महत्त्वाचे तपशील टाकावे लागणार आहेत. अनेकदा एकाचवेळी सारे विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी गर्दी करतात त्यामुळे वेबसाईट क्रॅश होण्याचे प्रकार वाढतात. अशावेळी विद्यार्थ्यांना DigiLocker किंवा UMANG apps वर निकाल पाहता येऊ शकतो.
सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार?
सीबीएसई बोर्डाचा दहावी, बारावी चा निकाल कधी लागणार? याची माहिती अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मागील काही वर्षांचे ट्रेंड्स पाहता दहावीचा निकाल मे 2025 च्या पहिल्या, दुसर्या आठवड्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. 2024 मध्ये सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल 13 मे तर 2023 मध्ये 12 मे दिवशी जाहीर करण्यात आला होता. यंदाची निकालाची तारीख अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे सोशल मीडीयामध्ये कोणत्याही वायरल मेसेज वर विश्वास ठेवू नका. अधिकृत सूत्रांकडून तारीख निश्चित झाली की त्याची माहिती सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईट आणि अधिकृत सोशल मीडीया हॅन्डलवर तपासा.
सीबीएसई बोर्डाचा 10th चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in ला भेट द्या.
- होमपेज वर CBSE 10th Board Result 2025 official link वर क्लिक करा.
- आवश्यक तपशील भरा.
- आता तुमची सविस्तर मार्कशीट पाहू शकाल.
- निकालाची प्रिंट आऊट काढू शकता ती डाऊनलोड करू शकता.
ज्या उमेदवारांना त्यांच्या निकालांवर समाधान नाही ते देखील गुण पडताळणी किंवा निकाल सुधारणेसाठी अर्ज करू शकतात. ज्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना प्रत्येक विषयासाठी लागू असलेले ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.