Students | Twitter

Central Board of Secondary Education अर्थात सीबीएसई बोर्डाच्या 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांसाठीचं प्रॅक्टिकल परीक्षांचे (Practical Exam) वेळापत्रक cbse.gov.in वर जारी करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2024 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत. अद्याप विषयानुसार परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक प्रतिक्षेमध्ये आहे. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना त्याचे प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स, इंटरनल असेसमेंट्सचे इतर प्रोजेक्ट्स द्यावे लागतात. Board Exams: आता वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा; विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, जाणून घ्या सविस्तर .

परीक्षेचं वेळापत्रक कसं पहाल ऑनलाईन?

  • Central Board of Secondary Education ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील "Examination"च्या सेक्शन वर क्लिक करा.
  • परीक्षांच्या तारखांची माहिती देणारी लिंक पहा.
  • स्क्रिनवर पीडीएफ स्वरूपामध्ये परीक्षेचं वेळापत्रक दिसेल.
  • हे वेळापत्रक तुम्ही सेव्ह देखील करू शकाल.

सीबीएसई कडून प्रॅक्टिकल परीक्षा ही 30 गुणांसाठी घेतली जाते. विषयानुसार त्याच्या ग्रेड्स बदलतात. यापूर्वी बोर्डाने winter-bound schools साठी प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहे. या परीक्षा 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. तर बोर्डाची 10वी, 12वी ची  लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. आत्तापर्यंत, CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यावर्षी, सार्वत्रिक निवडणुकांसह, मंडळाने वेळापत्रकाच्या फर्स्ट हाफ मध्ये  मुख्य परीक्षा घेणे अपेक्षित आहे. CBSE मुख्य पेपर्स तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय 15 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करू शकते पण, बोर्डाने पुष्टी केली की CBSE 2024 इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील.