Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

सीबीएसई परिक्षेचं बोगस वेळापत्रक सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या वेळापत्रकात पेपर कधी पासून सुरु होणार ते पेपर कधी संपणार आणि कुठल्या दिवशी कुठला पेपर असेल या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरी व्हायरल होणार हे वेळापत्रक बनावट असल्याची माहिती सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली आहे. सीबीएसई परिक्षेसोबतचं सीआयएससीई परिक्षेची खोटी देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाली हे. तरी विद्यार्थ्यांसह पालकांनी या नकली तारखांवर विश्वास ठेवू नये असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी जारी झालेलं हे वेळापत्रकचं खरं वेळपत्र असण्याचा गैरसमज काही विद्यार्थ्यांना झाला असल्याने हे वेळापत्रक एकमेकांसोबत शेअर केल्या जात आहे. तरी कुणीही ही माहिती शेअर करु नये आणि खोटी माहिती पसरवण्यास चाप मिळावा यासाठी सीबीएससी बोर्डाकडून काही विशेष सुचना देण्यात आल्या आहे.

 

सीबीएसई बोर्डाकडून एक विशेष नोटीस जारी करण्यात आला आहे. ज्यात सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले वेळापत्रक हे बोगस वेळापत्रक असुन सीबीएसई कडून या प्रकारचं कुठलही वेळापत्रक जारी केलं गेलेलं नाही अशी माहिती देण्यात आली आहे. एवढचं नाही तर सीबीएसई जेव्हा केव्हा परिक्षेच्या तारखा किंवा वेळापत्रक जाहीर करेल तेव्हा सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. (हे ही वाचा:- Transfer Certificate: आता 'शाळा स्थलांतर प्रमाणपत्रा'शिवायही विद्यार्थ्यांना मिळणार अन्य शाळेत प्रवेश; शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांची माहिती)

 

साधारण फेब्रुअरी महिन्यात दरवर्षी सीबीएसई बोर्ड परिक्षा पार पडतात. यावर्षी या परिक्षा कुठल्याही निर्बंधाविना पार पडणार आहेत. तरी विद्यार्थ्यांना याविषयी शालेय विभागाकडून तसेच सीबीएसई बोर्डातर्फे यासंबंधीत सुचना देण्यात येईल अशी माहिती सीबीएसई कडून नोटीसद्वारे देण्यात आली आहे.