Representational Image (Photo Credits: PTI)

भारतामध्ये वाढत्या कोरोना वायरस (Coronavirus)  रूग्णांची संख्या पाहता आता सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) त्यांच्या जुलै महिन्यात होणार्‍या 10 वी, 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (25 जून) सर्वोच्च न्यायालयामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta) यांनी ही माहिती कळवली आहे. दरम्यान कोरोना संकटकाळात लांबणीवर पडलेल्या परीक्षा आता 1 त 15 जुलै दरम्यान घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला होता. मात्र दिवसागणिक दिल्ली, महाराष्ट्रात वाढती रूग्णसंख्या पाहता अनेकांनी या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दाखवण्यात आली होती.

जनरल सॉलिसिटर यांनी केंद्रीय शिक्षण मंडळाची बाजू मांडताना सध्या सीबीएससी बोर्ड परीक्षा रद्द करत आहे. 12वीचे विद्यार्थी नंतर आयोजित परीक्षांना सामोरे जाऊ शकतात असे सांगितले आहे. IIT-Bombay चे डिसेंबर 2020 पर्यंतचे वर्ग ऑनलाईन होणार; COVID 19 च्या पार्श्वभूमीवर निर्णय.

ANI Tweet

सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा होणार नाही. मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा नवं वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मागील परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांचे गुण पाहून अंतिम निकाल लावला जाणार असल्याची माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयानेदेखील सीबीएससी बोर्डाची बाजू ऐकून घेत त्यांना बारावीच्य विद्यार्थ्यांसाठी नवं नोटिफिकेशन काढण्यास सांगतलं आहे. दरम्यान शुक्रवार (26 जून) दिवशी याबाबत न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे.

देशभरात मागील 3 महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे HRD मंत्रालयाने 10वी, 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत आता जुलै महिन्यात परीक्षा घेण्यासाठी 18 मे दिवशी नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं.