Online | Pixabay.com

Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी कडून CTET 2024 च्या परीक्षेसाठी exam city intimation slip जारी केल्या आहेत. जे परीक्षार्थी CTET December 2024 examination साठी रजिस्टर आहेत त्यांना आता exam city slip अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यंदा CTET 2024 ची परीक्षा 14 डिसेंबर 2024 दिवशी होणार आहे.

CTET 2024 City Intimation Slip काशी कराल डाऊनलोड?

  • अधिकृत वेबसाईट ctet.nic.in ला भेट द्या.
  • होम पेज वर “View Date & City for CTET Dec-2024" ला क्लिक करा.
  • आता लॉगिन डिटेल्स टाका. यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पसवर्डचा समावेश असेल.
  • त्यानंतर सबमिट वर क्लिक केल्यावर CTET 2024 Exam City Slip तुमच्या सक्रीन वर दिसेल.
  • आता city intimation slip पहा आणि ती सेव्ह करून ठेवू शकता.

इथे पहा डिरेक्ट लिंक

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की परीक्षा शहर स्लिपचा उद्देश फक्त परीक्षा केंद्रांची तारीख आणि शहर याबद्दल माहिती देणे आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या CTET 2024 प्रवेशपत्रांवर परीक्षा केंद्राचा पत्ता, अहवाल देण्याची वेळ आणि इतर महत्त्वाची माहिती मिळेल जी योग्य वेळी जाहीर केली जाईल.

सीटीईटी परीक्षेत दोन पेपर आहेत. सकाळी 9.30 -12 या वेळेत असलेल्या सकाळच्या शिफ्टमध्ये पेपर 2 होणार आहे. दुपारची शिफ्ट, दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत, यामध्ये पेपर 1 होईल. पेपर 1 हा ग्रेड 1 ते 5 मधील शिक्षक पदासाठी आहे. पेपर 2 हा ग्रेड 6 ते 8 मधील रिक्त पदांसाठी आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये असणार आहेत.