CBSE News: देशभरातील जवळपास 20 शाळांची संलग्नता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) रद्द केली आहे. मंडळाने केलेल्या अचानक तपासणीमध्ये सदर शाळांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे पुढे आले. खास करुन हा गैरप्रकार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबत केला जात होता. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे आणि पुणे येथील प्रत्येकी एक अशा दोन शाळांचा समावेश आहे. शाळेत उपस्थित नसणारे किंवा अस्तित्वातच नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे या शाळेने पटावर घेतली होती. पात्रता नसलेले किंवा तोतया विद्यार्थीही (Dummy Students) शाळेच्या पटावर असल्याचे आढळून आले. ज्यामुळे त्यांना पटसंख्येवर आधारीत असणाऱ्या आणि केंद्रीय शिक्षण मंडळाद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा-सुविधा मिळत होत्या. मात्र, मंडळाने अचानक केलेल्या तपासणीमुळे शाळेच्या गैरव्यवहाराचा भांडाफोड झाला. त्याची परिणीती शाळांची संलग्नता रद्द (CBSE Disaffiliates 20 Schools) होण्यावर झाली.
संलग्नित शाळांना दिलेल्या भेटीमध्ये केंद्रीय मंडळाला अनेक त्रुटी आढळून आल्या. ज्यामध्ये तोतया विद्यार्थी, अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांची पटावर नावे, शाळेचे रेकॉर्ड अद्ययावत आणि योग्य पद्धतीने न ठेवणे, ते काळजीपूर्वक न सांभाळणे यांसारख्या अनेक त्रुटी आढळल्याचे सीबीएसई संचालक हिमांशू गुप्ता यांनी सांगितले. (हेही वाचा, CBSE Not To Award Distinction: CBSE 10वी, 12वी बोर्ड परीक्षांमध्ये कोणताही विभाग, डिस्टिंक्शन देणार नाही: परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांची माहिती)
कोणत्या राज्यातील किती शाळांची संलग्नता रद्द?
महाराष्ट्र- एकूण शाळा दोन
राहुल इंटरनॅशनल स्कूल, ठाणे
पायोनियर पब्लिक स्कूल, पुणे
राजस्थान- एकूण शाळा-2
प्रिन्स यूसीएच माध्यमिक विद्यालय, सीकर
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल- जोधपूर
छत्तीसगड- एकूण शाळा- 2
द्रोणाचार्य पब्लिक स्कूल
व्हिकॉन स्कूल, रायपूर
जम्मू कश्मीर
करतार पब्लिक स्कूल, कठुआ (शाळेचे विघटन)
असम
सन आरएनएस अकादमी
श्रीराम अकादमी, बारपेटा
मध्य प्रदेश
सरदार पटेल पब्लिक स्कूल, भोपाळ
उत्तर प्रदेश
लॉयल पब्लिक स्कूल, उत्तर प्रदेश
ट्रिनिटी वर्ल्ड स्कूल, गौतम बुद्ध नगर
क्रिसेंट कॉन्व्हेंट स्कूल, गाझीपूर
केरळ
मदर थेरेसा मेमोरियल सेंट्रल स्कूल
पीव्हीस पब्लिक स्कूल
उत्तराखंड
रायन आइनस्टाइन इंटरनॅशनल स्कूल
दिल्ली- एकूण शाळा-5
सिद्धार्थ पब्लिक स्कूल
भारत माता सरस्वती पाल मंदिर
नॅशनल पब्लिक स्कूल
चांद राम पब्लिक सीनियर से. स्कूल
मॅरीगोल्ड पब्लिक स्कूल.
पंजाब
श्री दशमेश सीनियर सेकेंडरी पब्लिक स्कूल, बटिंडा
गुप्ता यांनी सांगितले की, सीबीएसईद्वारे एक मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये देशभरातील संलग्नीत शाळांना अचानक भेटी देण्यात आल्या. संलग्नित शाळा नियम आणि तरतुदींना अनुसरुन काम करत आहेत की नाही याबाबत तपासणी करणे आवश्यक होते. याशिवाय, आमच्याकडे देशभरांतून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधणाऱ्या तक्रारीही आल्या होत्या, त्यामुळे ही तपासणी करणे आवश्यक होते. तपासणीदरम्यान ज्या शाळा दोषी आढळल्या त्यांच्यावर संलग्नता रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.