सीबीएसई बोर्ड परीक्षा (CBSE Board Exams) होणार किंवा नाही याबाबत आज दुपारी निर्णय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाशी चर्चा करणार आहेत. या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांच्यासह केंद्रीय शिक्षण मंत्रालय सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो यांकडे देशातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणीक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. देशातील वाढती कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या पाहता सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी मोठ्या प्रमाणावर देशभरातून होत आहे. प्रामुख्याने विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, आम आदमी पक्षाने सरकारकडे ही मागणी केली आहे. आजच्या बैठकीत केंद्र सरकार काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशीही मागणी केली होती. शिवेसना खासदार अरविंद सावंत यांनी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून राज्य आणि बोर्डांना इयत्ता 10 वी इयत्ता 12 बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, देशातील वाढती कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या पाहता केंद्र सरकारने सर्वांना सारखेच नियम करायला हवेत. तसेच, विद्यार्थ्यांचे कमीत कमी नुकसान होईल याकडेही लक्ष द्यायला हवे, असेही सावंत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, CBSE Board Exams 2021: सीबीएसई च्या 10वी, 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा, रद्द करण्याचा अद्याप विचार नाही, बोर्डाच्या अधिकार्यांची माहिती)
PM to hold a meeting with Education Minister, Secretary & other important officials at 12 noon to discuss the issue of CBSE Board Exams: Govt of India Sources pic.twitter.com/GQuyfMuWft
— ANI (@ANI) April 14, 2021
राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यातील इयत्ता 10 वी आणि इयत्ता बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात (Maharashtra Board Exams 2021 Postponed) आल्या आहेत. आता नव्या निर्णयानुसार इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कोणत्या तारखेला होणार याबाबत निश्चित स्पष्टता नाही. परंतू, इयत्ता दहावीची परीक्षा जून महिन्यात बारावीची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली. राज्याच्या शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला.