The Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी कडून 2024 च्या बोर्ड परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थी आपला अर्ज सादर करू शकणार आहेत. याकरिता 12 सप्टेंवर ते 11 ऑक्टोबर दरम्यानचा महिन्याभराचा वेळ देण्यात आला आहे. तर विलंब शुल्क भरून विद्यार्थी 12 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर पर्यंतही अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 2000 रूपये विलंब शुल्क आकारलं जाणार आहे.
सीबीएससी कडून खाजगी विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारितच घेतली जाणार आहे. 2024 च्या बोर्ड परीक्षेमध्ये खाजगी विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीची यादी देखील जारी करण्यात आली आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून कोण अर्ज करू शकतं?
- 2023 च्या निकालामध्ये जे विद्यार्थी 'रिपीट' म्हणून घोषित केले आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत एका कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या संधीच्या कंपार्टमेंट परीक्षेत कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे.
- 2018, 2019, 2020, 2021 चे अनुत्तीर्ण/आवश्यक पुनरावृत्ती करणारे विद्यार्थी
- 2022, 2023 चे उत्तीर्ण विद्यार्थी जे एक किंवा अधिक विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारू इच्छितात.
दरम्यान विद्यार्थ्यांनी बोर्डाकडून वेळोवेळी दिली जाणारी माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले आहे.