Logo of the Central Board of Secondary Education (Photo Credits: cbse.nic.in)

CBSE Board Exam Form 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शैक्षणिक सत्र 2020-21 साठी घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अर्जाची विंडो पुन्हा उघडली गेली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 संदर्भात शनिवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक वर्गातील असे सर्व विद्यार्थी जे काही कारणास्तव सीबीएसई बोर्ड 10 वी परीक्षा फॉर्म किंवा सीबीएसई बोर्ड 12 वी परीक्षा 2021 फॉर्म भरू शकलेले नाहीत. असे विद्यार्थी आता 13 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकतात.

याशिवाय उर्वरित विद्यार्थ्यांना आणि शाळांना परीक्षा फॉर्म भरण्यापासून एलओसी सादर करण्यासाठी बोर्डाने 13 फेब्रुवारीपर्यंत संधी दिली आहे. तसेच मंडळाकडून नव्याने संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली आहे. (वाचा - CBSE Board Exams 2021 Datesheet: सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या परीक्षेची 'डेट शीट' जाहीर, 'इथे' जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

सीबीएसई बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 मध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत सुधारणा करण्याची संधी -

उर्वरित विद्यार्थ्यांसाठी, तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास किंवा ज्यांना फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची आहे. अशा विद्यार्थांसाठी मंडळाने आणखी एक संधी दिली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 सुधारणे तसेच शाळांनी आधीच भरलेल्या एलओसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 रोजी निश्चित केली आहे.