CBSE 12th Compartment Exam Result 2020 जाहीर, विद्यार्थ्यांनी निकाल cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in संकेतस्थळावर तपासून पहा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

CBSE 12th Compartment Exam Result 2020: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) यांनी शुक्रवारी सीबीएसई 12 वी कम्पार्टमेंट निकाल 2020 जाहीर केला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होत त्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in येथे उपलब्ध करुन दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 59.43 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचसोबत विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल DigiLocker वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून तपासून पाहता येणार आहे.

12 वी इयत्तेतील कम्पार्टमेंट परीक्षा 2020 साठी एकूण 87,61 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. सीबीएसई क्लास 12 कम्पार्टमेंट परीक्षा सीबीएसईकडून सप्टेंबर 22 ते सप्टेंबर 29 या काळात पार पडली. तर जाणून घ्या परीक्षेचा निकाल तुम्हाला कसा पाहता येईस. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.(Revised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा)

>>प्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेवसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.

>>तेथे गेल्यावर CBSE 12th Class Compartmental Results च्या लिंकवर क्लिक करा.

>>येथे काही माहिती विचारली जाईल

>>वेरिफाय करुन माहिती द्या

>>तुमचा CBSE 12th Class Compartmental Results तुम्हाला स्क्रिनवर दिसून येईल.

>>निकाल पहा आणि तो डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

CBSE 12th Class Compartmental Results हा DigiLocker वर कसा तपासून पहाल

>>https://results.digitallocker.gov.in/cbse2020.html या संकेतस्थळावर जा

>> येथे गेल्यावर तुमचा रोल नंबर आणि अॅडमिट आयडी कार्ड द्या

>>समबिट केल्यानंतर निकाल डाऊनलोड करा.

रिपोर्ट्सनुसार, जवळजवळ 1,50,198 विद्यार्थी हे 10 वी इयत्ता आणि 87,651 हे 12 वी इयत्तेतील असून त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सीबीएसईला विचारले होते की, सीबीएसईने कम्पार्टमेंट परिक्षेचा निकाल expeditiously पद्धतीने जाहीर करावा.